Sunday, January 17, 2010
Best Online Backup options
Here is two best way to keep your data available whenever you require it.
MozyHome:
If you are looking for simple, easy to use online data backup solution then I will suggest you to go for MozyHome.
• They offer free 2 GB space, enough for personal and home users.
• All files are encrypted before uploading them to mozy server.
• Schedule your backup at specific time or use auto backup which will run when your computer is idle.
So configure it once, set all your important folders and relax, your data is backup silently and whenever any unfortunate thing happens with your hard disk you won’t loose your important data.
And if you are ready to pay you will get unlimited space to backup on mozy.
Click on https://mozy.com/?code=256937 and you will get 512 MB extra space :)
Adrive:
If you are not ready to pay and still want enough storage space then go for Adrive, but backup process is not as easy as Mozy.
Some good features for free users on Adrive:
• 50 GB free storage space.
• File sharing
• Remote file transfer
What features you missing here is file encryption, auto backup scheduler and desktop client. That’s why I said backup process is not as easy as Mozy.
It’s little risky to store sensitive data on Adrive as no encryption is provided for free users, you have to pay to get these features. To overcome this you can encrypt files locally and then upload it, but this will add one more step in backup process.
But if your data is not that much sensitive Adrive will be the best place to store as you are getting 50 GB for free.
I can advice free users to use both. For frequently updating data, backup it on Mozy, and once in three/six month encrypt it and move it on Adrive :)
Other good online backup options are:
MyOtherDrive
Steekr (for music)
Esnips
Saturday, April 5, 2008
मोफत घर...
मुंबईमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना मुंबईत घर म्हणजे एक न पुरे होणारे स्वप्न वाटत आहे आणि नुकतीच एक बातमी वाचानात आली. “धारावीत 400 चौ.फुटांची मोफत घरे !!” कायद्यानुसार वागणारी, मुंबईच्या लोकल ट्रेन मधे जीव मुठीत घेवून प्रवास करणारी, दरवर्षी कर भरणारी जनता आपण किती मूर्ख़ आहोत असा विचार करत असेल.
या सर्व झोपडपट्या अनधिकृत असताना केवळ मतांसाठी या अधिकृत केल्या गेल्या आहेत आणि आता यांना मोफत घरेही मिळणार आहेत. यासाठी पैसा सरकार आमच्याच खिशातून घेणार आहे. हि जनतेची ऊघडपणे चाललेली लूट नाही का?
या झोपडपट्टीमध्ये राहणार्या लोकांमधे बांगलादेशीयही मोठ्या प्रमाणावर असतात
हे सर्व आता ईथल्या मध्यमवर्गीय लोकांच्या पैशातून मुंबईचे नागरीक होणार आहेत.
गरीबांना घरे मिळावीत असे मलाही वाटते ती सर्वांचीच मूलभूत गरज आहे. पण या कृतीमुळे एक समज निर्माण होईल. कोणीही यावे मुंबईत पाहीजे तिथे झोपडी बांधावी, महापलिकेच्या पाण्याचे पाईप फोडून पाणी घ्यावे, चोरुन वीजही घ्यावी, हायवे आणि रेल्वे ट्रॅकचा शौचालय म्हणून वापर करावा मग काही वर्षांनी आपली ही सर्व अनधिकृत कामे सरकार अधिकृत करून आपल्याला मोफत घर देईल.
मागील काही घटनांवरून हे दिसून आले आहे की मोफत घर मिळाले की हे लोक काही दिवसानंतर ते विकून टाकतात आणि परत झोपडीमधे रहायला येतात. मग हे सर्व करून काय फायदा?
जर सरकारला खरोखरच काही करायचे असेल तर गरीबांसाठी स्वस्त दरात घरे उपलब्घ करून द्यावीत. पण त्याआधी ते येथील अधिकृत रहीवासी आहेत का ते पहावे. अनधिकृत बांधकाम अधिक़ृत करू नये. कोणालाही मोफत घर देत बसलो तर या मुंबईत परराज्यातून येणार्या लोकांना आवरणे कठीण होईल. एकटी मुंबई कोणा कोणाचे पोट भरणार.
सुशीक्षित लोकांनी पण एक लक्षात घेतले पाहीजे की ह्य़ा नेते मंडळींना झोपडपट्टीमध्ये राहणार्या लोकांचा पुळका आला आहे तो ते देत असलेल्या मतांमुळे.
महाराष्ट्रातील खेड्यात अथवा आदीवासी भागात मोफत घरे दिल्याचे माझ्यातरी वाचनात नाही.
आपल्यापैकी अनेक लोक मतदान करण्याचे टाळतो, जोपर्यंत आपण संघटीत होवून भ्रषटाचारी नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणार नाही तोपर्यंत आपल्या समस्यांची दखल घेतली जाणार नाही.
आपल्या परीने होईल त्याप्रकारे दिसणार्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी विरुद्घ आवाज आपण उठवला तरच हा समाज सुधारण्यास सुरुवात होईल. गरज आहे तर फक्त आपली जवाबदारी ओळखण्याची.
Wednesday, March 26, 2008
वीज...
महाराष्ट्र शासनाने आता वीज दुर्मिळ वस्तूंच्या यादी मध्ये समाविष्ट करून टाकावी म्हणजे जनतेला ती आपल्याला मिळवी असे वाटणार तरी नाही.
आणि महावितरणच्या कर्मचार्य़ांना आपल्या तोंडाला काळे फ़ासले जाण्याची भीती पण वाटणार नाही.
पाच सहा वर्षापूर्वी एक ते दोन तास असलेले भारनियमन आता दहा तासापर्यंत आणले आहे, बाकी क्षेत्रात असो वा नसो पण भारनियमन क्षेत्रात तरी सरकारने नक्कीच प्रगती केली आहे.
आता दाभोळने धोका दिला तर सरकार तरी काय करणार. तो प्रक्लप म्हणजे फक्त एक गाजर आहे जे युती शासनापासून जनतेला दाखवण्यात येत आहे.
आपले नेते विदेश दौरा करून तेथील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्याची गळ घालत असल्याच्या बातम्या मधे मधे वाचनात येतात पण त्यांना पण वीज हवी असते कारण ते काही वडापावची गाडी टाकण्यासाठी येथे येणार नाही हे शाळेतल्या पोरांना पण कळते पण बहुतेक नेत्यांना शाळासोडून बरीच वर्ष झाली असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येत नसावे.
तेव्हा आता या नेत्यांना परत शाळेत पाठवून त्यांचे सामान्यज्ञान वाढवावे. आणि एका सरकारी नेत्यानेच केलेल्या सूचने प्रमाणे शाळेत पंखे व लाईट यांची काही गरज नसते कारण शाळा दिवसा असते आणि पंख्यामुळे पेपर ऊडून जातात तेव्हा या नेत्यांच्या शाळेत पंखे व लाईट नसावेत याची सरकारने काळजी घ्यावी.
ह्याच सूचने नूसार दिवसा मंत्रालयातील व सर्व सरकारी ऑफीस मधील पंखे लाईट आणि एसी बंद ठेवून सरकारने आपल्या कर्तव्यदक्षतेचीग्वाहीही द्यावी ही नम्र विनंती.